शुक्रवार, १५ जून, २०१२

प्रेमाचे हे कोडे

                                                                                     प्रेमाचे हे कोडे, ना कधी कुणा उलगडे
प्रेमाचे हे फुल घाले सर्वांनाच भूल
प्रेमाच्या पाण्याला खळखळ फार
तरी  वाटे  मनाला  उडे  कारंजे  थुई थुई
प्रेम हे कोडे असते खरे
त्यात  भावना, हुरहूर, ओढ  हे सर्व ओघाने आलेच
प्रेम हे फुल ही असते, 
जे  जगाचा ,माणसाचा ,स्वताचा  विसर  पाडते ,
प्रेम  हे  निर्मळ असावे ,निर्व्याज  असावे
आयुष्यभर  टिकणारे  असावे 
प्रेम  करण्यासाठी  आयुष्यात  कुणीतरी  असावे
आयुष्यात  कुणीतरी  नक्कीच  असावे 

शुक्रवार, १ जून, २०१२

कधी कोणी समजू शकतो का या मुलींना?


समजून सगळे

नासमज बनतात मुली

चांगल्या चांगल्या मुलांना

वेडयात काढतात या मुली

अनोलखी पुरुषाला

दादा - भैय्या म्हणतात या मुली ,

पण आपल्याच वडलान्ना

काका का म्हणतात या मुली ,

बोलायला गेलो तर

लाइन मारतोय म्हणतात या मुली,

मग नाहीच बोललो की

शाइन मारतोय का म्हणतात या मुली?

मुद्द्याच बोलण थोड़च असत

तरी चिव चिव चिव चिव खुप करतात या मुली,

जेव्हा खरज बोलण्याची गरज असते ....

तेव्हा नजर खाली करून रुमाल का ख़राब करतात या मुली ?

पावसात भिजायच तर असत

तरी चिखल पाहून नाक का मुरडतात मुली ?

थंडी गुलाबीच चांगली अस म्हणतात!!!

मग 2-4 स्वेटर घालून सुद्धा कुडकुडतात का या मुली ??

वाचून ही कविता

चान्ग्ल्याच भडकतिल या मुली !!!!!

मग (कदाचित) विचार करून मनात...

थोड़ तरी बरोबर आहे महणतील या मुली ...